PF वर किती मिळणार व्याज? होळी अगोदर मिळणार आनंद वार्ता, 31 कोटी भारतीयांना होणार फायदा

नवी दिल्ली: होळीच्या अगोदर EPFO च्या 31 कोटी सदस्यांसाठी आनंद वार्ता मिळू शकते. ईपीएफओचे सेंट्रल बोर्ड ऑफ ट्रस्टीज (सीबीटी) यावर्षी 8.2 ते 8.25 टक्के व्याजदराची शिफारस करण्याची अपेक्षा आहे. शेअर बाजारातील घटत्या रिटर्नमुळे आणि बाँड उत्पन्नामुळे तसेच दाव्यांच्या सेटलमेंटमध्ये वाढ झाल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. गेल्या वर्षी हा दर 8.25 टक्के होता. 2024 च्या आर्थिक वर्षात तो 8.25 टक्के करण्यात आला. त्यापूर्वी 2023 मध्ये 8.15 टक्के आणि 2022 मध्ये 8.1 टक्के व्याजदर देण्यात आले होते, जे चार दशकांमधील सर्वात कमी होते.

सीबीटीची सोमवारी 2 मार्च रोजी बैठक होणार आहे. TOI च्या रिपोर्टनुसार, सीबीटीच्या एका सदस्याने सांगितले की जागतिक तणावपूर्ण परिस्थितीमुळे या वर्षी शेअर बाजार आणि इक्विटीजने चांगली कामगिरी केली नाही. ईपीएफओचे बहुतेक निधी सरकारी बाँडमध्ये गुंतवले जातात, परंतु तेथील उत्पन्न देखील समाधानकारक मिळाले नाही, त्यामुळे उत्पन्न कमी असण्याची शक्यता आहे.

प्रक्रिया काय?सोमवारी सीबीटी बैठकीपूर्वी बोर्डाच्या गुंतवणूक समितीची बैठकही होणार आहे. त्यात ईपीएफओच्या उत्पन्न आणि खर्चाच्या प्रोफाइलवर चर्चा होणार आहे. तसेच व्याजदराचा निर्णय घेतला जाणार आहे. सीबीटीच्या बैठकीचे अध्यक्षपद कामगार मंत्री मनसुख मांडविया यांच्याकडे असेल. सीबीटीकडून मंजुरी मिळाल्यानंतर, व्याजदरासंबंधी अर्थ मंत्रालयाचीही मंजुरी घ्यावी लागेल. त्यानंतर पुढील आर्थिक वर्षाच्या मध्यात तो ग्राहकांच्या खात्यात जमा केला जाणार आहे.भारतीय रिझर्व्ह बँकेने अलिकडच्या काही महिन्यांत रेपो दरात कपात केली आहे, तर सरकारने लघु बचत योजनांवरील व्याजदरात कोणताही बदलल केलेला नाही.

गुंतवणूक निधीत वाढनॅशनल फ्रंट ऑफ इंडियन ट्रेड युनियन्सचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक जयस्वाल म्हणाले की, विकासित भारत रोजगार योजनेमुळे गेल्या वर्षी लाखो नवीन कामगार सामील झाले, ज्यामुळे गुंतवणूक निधीत वाढ झाली. शिवाय, ईपीएफओकडे मागील आर्थिक वर्षाच्या तुलनेत लक्षणीय इन्कम सरप्लस आहे. म्हणून, सरकारने व्याजदरात कपात करू नये.

2026-03-01T15:02:02Z