नवी दिल्ली: कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) सोमवारी 2025-26 या आर्थिक वर्षासाठी EPF ठेवींवरील व्याजदर 8.25 टक्के निश्चित केला आहे. व्याजदरात कोणताही बदल न होता हे सलग दुसरे वर्ष आहे. गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये, EPFO ने 2024-25 या आर्थिक वर्षासाठी 8.25 टक्के व्याजदर कायम ठेवला होता.
पीटीआय या वृत्तसेस्थेच्या वृत्तानुसार, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (ईपीएफओ) सोमवारी 2025-26 या आर्थिक वर्षासाठी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (ईपीएफ) ठेवींवरील व्याजदर 8.25 टक्के निश्चित केला आहे, जो सलग दुसऱ्या वर्षी कायम ठेवण्यात आला आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने 2024 मध्ये व्याजदरात किरकोळ वाढ करून 2023-24 साठी 8.25 टक्के केला होता, जो 2022-23 मध्ये 8.15 टक्के होता. मार्च 2022 मध्ये, EPFO ने त्यांच्या सदस्यांसाठी निवृत्तीनंतरच्या ठेवींवरील व्याजदर 2021-22 साठी 8.10 टक्के होता. जो चार दशकांतील नीचांकी पातळीवर होता.
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या केंद्रीय विश्वस्त मंडळाची बैठक झाली आणि त्यांनी पीएफ व्याजदरांबाबत हा महत्त्वाचा निर्णय घेतला. केंद्रीय विश्वस्त मंडळ ही ईपीएफओची सर्वोच्च निर्णय घेणारी संस्था आहे, जी निधीचे व्यवस्थापन, गुंतवणूक आणि वितरण यावर देखरेख करते.
अर्थ मंत्रालयाच्या मंजुरीसाठी पाठवणारसीबीटीच्या निर्णयानंतर 2025-26 साठी ईपीएफ ठेवींवरील व्याजदर अर्थ मंत्रालयाच्या मंजुरीसाठी पाठवला जाईल. सरकारच्या मंजुरीनंतर, 2025-26 साठीचे व्याज कोट्यवधी ईपीएफओ सदस्यांच्या खात्यात जमा केले जाईल. अर्थ मंत्रालयामार्फत सरकारच्या मंजुरीनंतर ईपीएफओ व्याजदर प्रदान करते. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने 2019-20 साठी भविष्य निर्वाह निधी ठेवींवरील कमी करून 8.5 टक्के केला होता. 2018-19 हाच व्याजदर 8.65 टक्के होता.
गेल्या काही वर्षातील सर्वाधिक व्याजदर
2015-16 या वर्षी 8.80 टक्के हा गेल्या काही वर्षांमधील सर्वाधिक व्याजदर कर्मचाऱ्यांना पीएफवर मिळाला होता. तर 2013-14 आणि 2014-15 यावर्षी 8.75 टक्के व्याजदर मिळाला होता.
2026-03-02T12:02:02Z