गेल्या तीन ते चार वर्षांपासून सोन्याच्या किमती वाढत आहेत, मात्र 2025 मध्ये लक्षणीय वाढ झाली आणि नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. एमसीएक्सवर सोन्याच्या किमती 193,096 रुपयांच्या सर्वोच्च पातळीवर पोहोचल्या आहेत. सोन्याच्या किमतीमध्ये होणारी वाढ सुरू राहणार की त्यात काही घसरण होणार हा प्रश्न सर्वसामान्यांपासून बड्या गुंतवणूकदारांनाही पडला आहे. यासंबंधी उत्तर वर्ल्ड गोल्ड कांउसिलचे (WGC) सीईओ डेव्हिड टेट यांनी दिले आहे. WGC चे सीईओ डेव्हिड टेट यांनी सोन्याच्या किमती वाढण्याची दोन कारणे दिली आहेत.
सोन्याच्या किमती वाढण्याची कारणे?रायझिंग इंडिया समिट 2026 मध्ये बोलताना, डेव्हिड टेट यांनी शुक्रवारी सांगितले की भू-राजकीय अनिश्चितता आणि केंद्रीय बँकांकडून सतत खरेदी होत असल्याने सोन्याचे दर वाढत आहेत. टेट यांनी सांगितले की भू-राजकीय जोखमांसह केंद्रीय बँकांकडून स्थिर मागणी ही सोन्याच्या किमती वाढण्याचे प्रमुख कारण आहे.
घसरण केव्हा शक्य?डेव्हिड टेट यांनी पुढे सांगितले की सोन्याच्या किमतीत लक्षणीय घट तेव्हाच होऊ शकते जेव्हा अमेरिकन अर्थव्यवस्थेत मजबूत वाढीची तेजी (6-7 टक्के) असेल, त्यासोबत महागाईत थोडीशी वाढ होईल, ज्यामुळे सार्वजनिक कर्जात घट होऊ शकते. परंतु, त्यांनी अशा परिणामाची शक्यता फारच कमी असल्याचे वर्णन केले. टेट यांनी नमूद केले की गेल्या वर्षी सोन्याची गुंतवणूक मागणी वाढली आहे आणि जागतिक स्तरावर ती मजबूत राहण्याची अपेक्षा आहे.
2025 मध्ये झालेली सोन्याची वाढसोन्याच्या मागणीच्या कलावर बोलताना डेव्हिड टेट म्हणाले की 2025 मध्ये जागतिक सोन्याची मागणी विक्रमी उच्चांकावर पोहोचली आहे. भारतात, 2025 मध्ये एकूण सोन्याची मागणी सुमारे 711 टन असण्याचा अंदाज आहे, जरी वाढत्या किमतींमुळे दागिन्यांची मागणी कमी झाली आहे. 2025 मध्ये भारतात सोन्याची 60 ते 70 टक्क्याने वाढ झाली आहे. गेल्या वर्षाच्या सुरुवातीला 76000 ते 77000 असलेले सोन्याचे दर वर्ष अखेरी पर्यंत 1,35,000 रुपये होते.
2026-02-27T12:02:04Z