रेल्वे तिकीट बुकिंग ते युपीआय पेमेंटपर्यंत 1 मार्चपासून बदलले 5 नियम; तुमच्या आणि आमच्यावर होणार थेट परिणाम! पाहा कशी लागणार खिशाला कात्री

March 1 Rule Changes: 1 मार्च 2026 पासून देशभरात अनेक महत्त्वाचे नियम बदलले जाणार आहेत, ज्याचा थेट परिणाम सामान्य लोकांच्या दैनंदिन जीवन आणि खिशावर होईल. रेल्वे तिकीट बुकिंग, एलपीजी सिलिंडर, सिम कार्ड, बँक खाती, UPI आणि मेसेजिंग ॲप्सशी संबंधित हे बदल आहेत.

Financial Rules Change: 1 मार्च 2026 पासून तुमच्या पैसे आणि दैनंदिन आयुष्याशी संबंधित नियमात बदल होणार आहेत. रेल्वे तिकिट बुकिंगपासून ते LPG सिलेंडरच्या किंमती, सिम कार्ड, बँक खाती, यूपीआय आणि मेसेजिंग ॲप्सपर्यंत बदल मार्च महिन्याच्या पहिल्या तारखेपासूनच लागू होतील. सुरक्षेत वाढ, फसवणूक रोखण्यास आणि सेवा सुधारण्यासाठी नवीन बदल लागू होणार असून प्रत्येकाला या बदलांबद्दल जाणून घेणं महत्त्वाचे आहे.1 मार्चपासून रेल्वे तिकीट बुकिंगचे नवे नियम

1 मार्चपासून भारतीय रेल्वेकडून तिकीट बुकिंगचे नवीन नियम लागू होणार आहेत. जुन्या UTS अ‍ॅपद्वारे जनरल तिकिटे किंवा प्लॅटफॉर्म तिकिट बुकिंगची पद्धत बंद होईल आणि रेल्वे प्रवाशांना आता वेगळ्या अ‍ॅप्स वापरण्याऐवजी एकाच प्लॅटफॉर्मवर सर्व सेवा मिळू लागतील.रेल वन अ‍ॅपच्या मदतीने जनरल तिकिट आणि प्लॅटफॉर्म तिकिटे व्यतिरिक्त आरक्षण बर्थ, सीट बुकिंग, ट्रेनची स्थिती आणि लाईव्ह लोकेशनशी संबंधित सर्व एकाच ठिकाणी मिळू शकेल.

1 मार्चपासून UPI चा नवीन बदल

डिजिटल पेमेंट पद्धत आणखी सोपं करण्यासाठी 1 मार्चपासून सिक्युरिटी लेव्हल मजबूत केले जाणार आहे. यानुसार UPI द्वारे मोठ्या रकमेच्या व्यवहारांसाठी अतिरिक्त पडताळणीचे वेगवेगळे टप्पे जोडले जातील. 1 मार्चपासून तुम्ही यूपीआय वापरून मोठी रक्कम ट्रान्सफर केल्यास UPI पिन व्यतिरिक्त तुम्हाला बायोमेट्रिक पडताळणी आणि अतिरिक्त प्रमाणीकरण करावे लागेल.

बँकेच्या कामकाजाच्या पद्धतीतही बदल होणार

काही बँकांचे किमान शिल्लक आवश्यकता बदलू शकतात किंवा बचत खात्याचे नियम अपडेट होण्याची शक्यता आहे. तसेच UPI व्यवहारांसाठी साप्ताहिक क्रेडिट स्कोअर तपासणी किंवा OTP किंवा मर्यादा बदल यासारख्या अतिरिक्त सुरक्षा वैशिष्ट्यांमध्येही बदल होण्याची अपेक्षा आहे. याव्यतिरिक्त, काही बँका त्यांच्या क्रेडिट कार्ड ऑफरमध्ये देखील बदल करू शकतात, ज्यामध्ये रिवॉर्ड पॉइंट्स किंवा शुल्काचा समावेश आहे.

व्हॉट्सॲप वापरण्यासाठी नवीन अटी

1 मार्च म्हणेज आजपासूनच व्हॉट्सॲप आणि टेलिग्राम सारख्या अ‍ॅप्सबद्दलचे बदल लागू झाले आहेत. मेसेजिंग अ‍ॅप्ससाठी नवीन सिम-बाइंडिंग नियम लागू होणार आहेत ज्यानुसार व्हॉट्सॲप आणि टेलिग्राम सारखे अ‍ॅप्स सक्रिय सिम कार्डशी जोडले जातील. या बदलाचा फायदा म्हणजे तुमच्या फोनमध्ये सिम कार्ड नसेल किंवा सिम निष्क्रिय असेल, तर 1 मार्चपासून व्हॉट्सॲप आणि टेलिग्रामसारखे अ‍ॅप्स त्या फोनवर काम करणार नाहीत.

एलपीजी गॅस सिलिंडरचे नवीन दर

दर महिन्याच्या पहिल्या दिवशी गॅस सिलिंडरचे दर जाहीर केले जातात आणि 1 मार्च रोजी घरगुती स्वयंपाकाच्या गॅस आणि व्यावसायिक सिलिंडरच्या किमतींचा आढावा घेऊन नव्या किमती जाहीर केल्या आहेत. तेल कंपन्या सकाळी 6 वाजता नवीन गॅस सिलिंडरचे दर केले आहेत. सामान्य कुटुंबांसाठी एलपीजी सिलिंडरचे दर खूप महत्वाचे आहे कारण गॅसच्या किमती दैनंदिन बजेटवर परिणाम करतात.

2026-03-01T06:02:02Z