मिडल-ईस्ट युद्धामुळे सोन्यासह चांदीत महागाईची धुळवड; बाजार उघडताच बॉम्ब फुटला, रुपेरी चमक 10 हजारांनी वाढली, सोनं किती महाग?

Gold and Silver Prices After Middle East Tensions: गेल्या दोन दिवसांपासून मध्य पूर्वेतील वाढत्या युद्धजन्य परिस्थिती दरम्यान गेल्या काही दिवसांपासूनच्या चढ-उतारानंतर सोने आणि चांदीच्या दरांमध्ये सोमवारी, 2 मार्च रोजी दरवाढीला बॉम्ब फुटला आहे. अमेरिका-इस्रायलने इराणवर हल्ले केले आणि सर्वोच्च खाऊ अतुल्लाह अमेरीकी हत्या केली, परिणामी आर्थिक आणि निश्चितता वाढल्यामुळे मल्टी कमोडिटी एक्स्चेंजवर सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी वाढ झाली.

अमेरिका-इराण युद्धामुळे सोने-चांदीत दरवाढीचा धमाका

सोमवारी सकाळी बाजार उघडताच सोन्याच्या किमतीत 3% पेक्षा जास्त वाढ झाली तर चांदीच्या किमतीत जवळपास 9500 रुपयांची वाढ झाली. विश्लेषकांना अस्थिरता वाढण्याची अपेक्षा असून भू-राजकीय तणाव आणि जागतिक आर्थिक अनिश्चितता तीव्र होताना प्रमुख सपोर्ट आणि रेसिस्टन्स पातळीवर गुंतवणूकदार लक्ष ठेवून असतील.

अमेरिका आणि इस्रायलने इराणवर मोठे हल्ले करून त्यांचे सर्वोच्च नेते अली खामेनेई यांची हत्या केल्यानंतर सोमवारी मल्टी कमोडिटी एक्सचेंज ऑफ इंडिया (एमसीएक्स) वर सोन्या-चांदीच्या किमतींमध्ये मोठी वाढ झाली. वाढत्या भू-राजकीय तणाव आणि वाढत्या जागतिक आर्थिक अनिश्चिततेमुळे मौल्यवान धातूंमध्ये गुंतवणुकीची मागणी वाढली.

अमेरिकेचा इराणवर क्षेपणास्त्र हल्ला

अमेरिका-इस्रायल-इराण युद्धाबद्दल बाजाराची प्रतिक्रिया अपेक्षेप्रमाणे नकारात्मक राहिली. मध्य पूर्वेतील वाढत्या तणावामुळे जागतिक भावनांवर परिणाम झाला असल्याने सोमवारी भारतीय शेअर बाजार कोसळले. आठवड्याच्या शेवटी झालेल्या नवीन हल्ल्यांमुळे कच्च्या तेलाच्या किमती वाढल्या, ज्यामुळे गुंतवणूकदारांना सुरक्षित गुंतवणूक पर्याय शोधण्यास भाग पडले आहे.

देशांतर्गत फ्युचर्स बाजार, एमसीएक्स,वर एप्रिल सोन्याचा दर 5811 रुपये किंवा 3.5% वाढून 1,67,915 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. त्याचवेळी, मार्च चांदीचा वायदा दर 9,492 रुपये किंवा 3.5% वाढीसह 2,84,490 रुपये प्रति किलोवर पोहोचला. अशाप्रकारे आता सोमवारी, मुंबईतील सराफा बाजारात 22 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 8 ग्रॅम 1,28,928 रुपये तर शुद्ध सोन्याचा म्हणजे 24 कॅरेटचा दर 1,38,472 रुपये आहे.

त्याचवेळी, आंतरराष्ट्रीय बाजारात चार आठवड्यांपेक्षा जास्त काळातील उच्चांकी गाठल्यानंतर स्पॉट सोन्याचा भाव 1% वाढून 5,329.39 डॉलर प्रति औंस झाला. याउलट, फेब्रुवारीमध्ये मासिक वाढ नोंदवल्यानंतरही स्पॉट चांदीची किंमत 2% पेक्षा जास्त वाढून $95 डॉलर प्रति औंस झाली.

2026-03-02T05:02:00Z