Crude Oil Price After Iran-Israel War: मध्यपूर्वेतील अमेरिका, इस्रायल आणि इराणमधील वाढत्या तणावाचा परिणाम आता जागतिक तेल बाजारावर दिसू लागला आहे. अलिकडच्या घटनांमुळे कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी वाढ झाली असून कच्च्या तेलाच्या किमती लवकरच 100 डॉलरचा आकडा पार करेल असा अंदाज बांधला जात आहे.
ब्रेंट क्रूडच्या किमती जवळपास 12% वाढून $80 प्रति बॅरलवर पोहोचल्या आहेत, तर यूएस WTI क्रूडचा दर देखील जवळजवळ 8% वाढून $70 प्रति बॅरल झाला आहे. गेल्या आठवड्यात, शुक्रवारी, ब्रेंट क्रूड ऑइलची किंमत $72 च्या वर क्लोज झालेली, जो सात महिन्यांचा उच्चांक होता. पण, सोमवारी बाजार उघडल्यावर 12% वाढून $80 प्रति बॅरलवर पोहोचले. जून 2025 नंतर पहिल्यांदाच ब्रेंट कच्च्या तेलाची कमीत $80 वर पोहोचली आहे.
100 डॉलर पार जाणार कच्च्या तेलाची किंमत?
मध्यपूर्वेत वाढता संघर्ष आणि पुरवठ्याबाबतच्या चिंतेमुळे गुंतवणूकदारांचे टेन्शन वाढले आहे. तसेच परिस्थिती लवकरच सामान्य झाली नाही तर, तेलाच्या किमती प्रति बॅरल 100 डॉलरपर्यंत पोहोचू शकतात. जागतिक तेल उत्पादनात इराणची महत्त्वपूर्ण भूमिका आहे आणि OPEC+ गटातील सर्वात मोठ्या उत्पादकांपैकी आहे. दररोज लाखो बॅरल तेल उत्पादन करण्याची इराणची क्षमता आहे, त्यामुळे तेथील कोणत्याही अस्थिरतेचा थेट परिणाम जागतिक पुरवठ्यावर होतो.
इराणकडून होर्मुझ सामुद्रधुनी बंद
त्याचवेळी, जगातील सर्वात महत्त्वाचा सागरी मार्ग मानला जाणारा होर्मुझ सामुद्रधुनीबद्दलही चिंता कायम असून बाजारात पुरवठा राखण्यासाठी आणि किमतीतील अत्यधिक चढउतार नियंत्रित करण्यासाठी OPEC+ देशांनी एप्रिलपासून तेल उत्पादन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या काळात मध्य पूर्वेतील परिस्थितीवर तेल बाजार मोठ्या प्रमाणात अवलंबून असेल असे तज्ञांचे मत आहे.
2026-03-02T03:32:01Z