मुंबई: इराण-इस्रायल अमेरिका यांच्यातील युद्ध आणि मध्य पूर्वेतील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, सोमवारी भारतीय शेअर बाजारात मोठी घसरण झाली. बीएसई सेन्सेक्स 1,000 पेक्षा जास्त अंकांनी घसरला. या घसरणी दरम्यान, संरक्षण क्षेत्रातील शेअर्समध्ये लक्षणीय वाढ दिसून आली, 13 टक्क्यांपेक्षा जास्त वाढ झाली होती. ही वाढ इराण-इस्रायल युद्धाशी जोडली जात आहे.
सोमवारी संरक्षण क्षेत्रातील पारस डिफेन्स अँड स्पेस टेक्नॉलॉजीजमध्ये सर्वात जास्त वाढ झाली, 13.5 %. हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (एचएएल), भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (बीईएल) आणि भारत डायनॅमिक्स लिमिटेडच्या शेअर्समध्येही लक्षणीय वाढ झाली.
पारस डिफेन्स अँड स्पेस टेक्नॉलॉजीजशुक्रवारी पारसचे शेअर्स 638.30 वर बंद झाले. दिवसाच्या व्यवहारादरम्यान, शेअर्स 13.14 टक्के वाढून 722.20 रुपयांवर पोहोचले. नंतर तो घसरला आणि 5.95% वाढून 676.25 वर बंद झाला.
हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडशुक्रवारी हा शेअर 3914 वर बंद झाला. सोमवारी तो 3738.05 वर उघडला. दिवसभरात तो 1.75 % वाढून 3982.60 रुपयांवर पोहोचला. नंतर त्यात काही घसरणही दिसून आली. व्यवहाराच्या शेवटी, हा शेअर जवळजवळ 1% वाढून 3951.75 वर बंद झाला. एका दिवसात 200 रुपयांवरुन वाढ झाली आहे.
भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडशुक्रवारी हा डिफेन्स स्टॉक 444.45 वर बंद झाला. सोमवारी तो 442 रुपयांवर उघडला, परंतु नंतर त्याला गती मिळाली. दिवसाच्या व्यवहारादरम्यान, हा शेअर 2.78% वाढून 456.80 रुपयांवर पोहोचला. पण अखेर तेजी टिकली नाही. 2.09 % वाढून 453.75 रुपयांवर बंद झाला.
तेजीचं कारणइराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांच्या मृत्यूनंतर मध्य पूर्वेतील तणाव वाढला आहे. या घडामोडींनंतर, संरक्षण उपकरणांची मागणी आणि निर्यात संधींमुळे गुंतवणूकदार संरक्षण क्षेत्रात अधिक रस घेत आहेत. तज्ज्ञांचे मत आहे की, जागतिक भू-राजकीय अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर, संरक्षण कंपन्यांना नवीन ऑर्डर आणि निर्यात संधी मिळू शकतात, ज्यामुळे या क्षेत्राला महत्त्व मिळू शकते.
Disclaimer : शेअर बाजारातील गुंतवणूक जोखीमेची असू शकते. कोणतीही गुंतवणूक करण्यापूर्वी प्रमाणित सल्लागाराचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
2026-03-02T14:32:02Z