नवी दिल्ली: भारतात सोन्याला पूर्वापार काळापासून अनन्य साधारण महत्त्व आहे. भारतीयांकडून केवळ सोन्याचे दागिनेच बनवले जात नाहीत. तर अचानक पैशाची गरज भासल्यास लोक सोने तारण ठेवून कर्ज घेतात. आज देशात बँका आणि वित्त पुरवठा कंपन्यांच्या माध्यमातून सोन्याचे दागिने गहाण ठेवतात. ताज्या आकडेवारीनुसार, डिसेंबर 2025 मध्ये 24,061 कोटी रुपयांचे सोने तारण कर्ज घेण्यात आले आहे. ही वाढ आश्चर्यकारक आहे.
रिझर्व्ह बँकेचा मासिक रिपोर्टभारतीय रिझर्व्ह बँकेच्या मासिक रिपोर्टनुसार, सोने तारण कर्जात एका वर्षात तब्बल 127 टक्क्यांची वाढ झाली आहे. आर्थिक वर्षाच्या आधारे 85.5 टक्के वाढ आहे. 31 मार्चपर्यंत कर्जाची थकबाकी 2,06,282 कोटी होती. तर नोव्हेंबर 2025 पर्यंत ती वाढून 3,58,645 कोटी होती. 31 डिसेंबर 2025 पर्यंत 3,82,706 कोटी झाली. यावरुन निदर्शनास येते की सोने तारण कर्ज आता मर्यादित वर्गासाठी उपलब्ध असलेला पर्याय राहिला नाही. असंख्य लोकांकडून सोने तारण कर्ज काढले जात आहे.
सोने तारण कर्ज ट्रेंड का बनत आहे?सोने तारण कर्ज वाढण्यामागे दोन कारणे समोर येत आहे. पहिले सोन्याचे दागिने बँका किंवा एनबीएफसी त्याची शुद्धता तपासतात आणि लवकर कर्ज देतात. त्याकरिता जास्त कागदपत्रांची गरज नाही. CIBIL स्कोअर तपासण्याची आवश्यकताही नाही. दुसरे कारण म्हणजे 2.5 लाख रुपयांपर्यंत कर्ज घेण्यासाठी सोन्याच्या दागिन्यांच्या किमतीच्या 85 टक्के कर्ज मिळते. तसेच सोने कर्जाचे व्याजदर हे क्रेडिट कार्डपेक्षा कमी असतात. त्यामुळेच हा पर्याय ग्राहक स्वीकारत आहेत.
नकारात्मक संकेततज्ज्ञांना वाटते की, महागाई, पैशांची गरज आणि सहज उपलब्धेमुळे होणारे सोने कर्जाला सर्वसामान्यांनी आपत्कालिन फंडमध्ये बदलले आहे. परंतु सोने तारण कर्जासंबंधी वाढता ट्रेंड एक नकारात्मक संकेत आहे. लोक छोट्या गरजेसाठीही सोने गहाण ठेवत आहेत. गरजांसाठी सामान्यत: बचत करणे आवश्यक आहे. पण आज कर्जाचे सहज उपलब्ध असणारे अनेक पर्याय अतिरिक्त खर्च करण्यासही प्रवृत्त करत आहेत.
2026-02-28T13:32:02Z