India Oil Reserve: मिडल-ईस्टमध्ये इराण संकटादरम्यान भारतासह जगभरातील देशांना भेडसावणाऱ्या तेलाशी संबंधित समस्यांबद्दल चिंता सतावत आहे. इराण आणि अमेरिकेतील युद्धजन्य परिस्थितीदरम्यान भारताने तेल खरेदीवरील वाढत्या संकटाला तोंड देण्यासाठी ‘प्लॅन B’ देखील तयार ठेवला आहे. मात्र, होर्मुझच्या सामुद्रधुनीसारख्या प्रमुख कच्च्या तेलाच्या पुरवठा मार्गाच्या बंद होण्यामुळे भारताला नजीकच्या भविष्यात कच्च्या तेलाच्या पुरवठ्यात कोणताही मोठा अडथळा येण्याची शक्यता कमी असल्याचे तज्ञांचे म्हणणे आहे.
सध्या भारताकडे किमान 10 दिवस पुरेल इतका भारताकडे तेलाचा साठा आहे, तेलाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी पुरेसे असल्याचे या प्रकरणाची माहिती असलेल्या अधिकाऱ्याने अधिकाऱ्यांनी सांगितले. त्याचवेळी, मध्यपूर्वेत परिस्थिती बिकट झाल्यास आणि इराणमधील संकट लांबले तर भारत पुन्हा रशियाकडून तेल खरेदी वाढवू शकतो.
आणखी एका अधिकाऱ्याने सांगितले की व्हेनेझुएला, ब्राझील आणि आफ्रिका सारख्या दूरच्या देशांकडूनही भारत तेल खरेदी करू शकतो, पण रशियासोबत कच्च्या तेल खरेदी करायची रणनीती सर्वात प्रभावी ठरेल. इराणमधील बदलत्या परिस्थितीचा तात्काळ परिणाम तेलाच्या किमतींवर दिसून येणे अपेक्षित असून सोमवारी बाजार उघडच कच्च्या तेलाच्या दरांमध्येही मोठी वाढ झाली.
2026-03-02T06:02:02Z