डॉलरपुढे चीनचे घालीन लोटांगण... करन्सी बाजारात फिल्डिंग लागली, अचानक निर्णय बदलला; अमेरिकेच्या मनातलं घडलं

Currency Market: गेल्या काही महिन्यात चीनचे चलन, युआन,ने करन्सी बाजारात जोरदार खळबळ उडवून दिली आहे. युआन मागील काही महिन्यात इतकं मजबूत झालं आहे ज्यामुळे आंतरराष्ट्रीय वित्तीय वर्तुळात विवाद सुरू झाले. अशा परिस्थतीत, हा मुद्दा फक्त चीनपुरता मर्यादित नसून त्याचा परिणाम जगभरातील चलने, बाजार आणि भारतासारख्या उदयोन्मुख देशांपर्यंत पोहोचला आहे.

करन्सी बाजारात चीनकडून मोठा डाव

मागील काही महिन्यांपासून चिनी युआन सतत मजबूत होत असून चीनचा व्यापार अधिशेष विक्रमी पातळीवर पोहोचल्याने निर्यातदारांनी मोठ्या प्रमाणात डॉलर्सची विक्री केली. डॉलर्स विकल्याने युआन मजबूत झाल्यावर बाजाराला चिनी चलनाची ताकद आणखी वाढण्याची अपेक्षा वाटू लागली.

पण प्रत्येक वाढ सकारात्मक नसते. चीनची अर्थव्यवस्था मोठ्या प्रमाणावर निर्यातीवर अवलंबून आहे. अशा परिस्थितीत, युआन मजबूत झाल्यास जागतिक बाजारात चिनी उत्पादने महागू शकतात आणि याच वेळी चीनची मध्यावर बँक पीपल्स बँक ऑफ चायना किंवा PBOC ने फासे बदलले.

चीनच्या एका खेळीने डॉलरची मागणी वाढली

चीनच्या मध्यवर्ती बँकेने परकीय चलन फॉरवर्ड डीलसाठी लागू असलेली 20% रिस्क रिझर्व्ह रक्कम काढून टाकली. हा एक टेक्निकल निर्णय होता, पण परिणाम मोठा होता. म्हणजे की आता करन्सी बाजारात डॉलर खरेदी सोपं होईल. अशाप्रकारे, चीनने थेट नाही तर नियम बदलून डॉलरची मागणी वाढवली. चिनी बँकेचा निर्णय होताच ऑफशोअर युआन लगेचच कमकुवत झाले. तसेच बाजारालाही स्पष्ट संकेत मिळाला की चीनला युआनची हालचाल स्थिर करायची आहे, तीव्रतेने नाही.

चीनच्या एका खेळीचा जगावर परिणाम, खळबळ उडाली

चीन केवळ एक देश नाही तर, जागतिक व्यापाराचे प्रमुख इंजिन आहे. ड्रॅगनच्या चलनात छोट्या-मोठ्या बदलांचे अनेक परिणाम होतात. यापैकी पहिला म्हणज एक डॉलरची मागणी वाढायच्या शक्यतेमुळे जागतिक परकीय चलन बाजारात अस्थिरता वाढली आहे. गुंतवणूकदारांना वाटू लागलं की डॉलर पुन्हा मजबूत होऊ शकतो. डॉलर मजबूत झाल्यास अनेक उदयोन्मुख अर्थव्यवस्थांच्या चलनांवर दबाव येऊ शकतो.

त्यांनतर कमोडिटी बाजारावर परिणाम होऊ शकतो. चीन धातू आणि ऊर्जेचा सर्वात मोठा ग्राहक आहे, त्यामुळे ड्रॅगनच्या चलनात बदल केल्यामुळे किंमतीतील अस्थिरता वाढू शकते, ज्याचा परिणाम निश्चितच जगभरातील कंपन्या आणि बाजारांवर होईल. त्याचवेळी, शेअर बाजारातील गुंतवणूकदारांच्या भावनेवरही परिणाम होईल. प्रमुख अर्थव्यवस्था त्यांच्या चलन धोरणांमध्ये बदल करतात तेव्हा जागतिक निधी प्रवाहाची देखील दिशा बदलू शकते. डॉलरच्या तुलनेत युआन वेगाने मजबूत होत असताना आणि ऑनशोर ट्रेडिंगमध्ये जवळजवळ तीन वर्षांच्या उच्चांकावर पोहोचत असताना चीनने आपला गेम बदलण्याचा निर्णय घेतला.

2026-02-28T09:17:01Z