एक VISA आणि 29 देशांत करा मज्जा! शेंजेन व्हिसा नेमका काय? कसा मिळतो? जाणून घ्या

नवी दिल्ली: जर तुमचा परदेश पर्यटनाचे नियोजन असेल आणि तुम्हाला अनेक युरोपीय देशांमध्ये प्रवास करायचे असेल, तर शेंजेन व्हिसा खूप मदत करू शकतो. शेंजेन व्हिसा हा एक असा व्हिसा आहे जो तुम्हाला स्वित्झर्लंड, जर्मनी, फ्रान्स, इटली, स्पेन, ऑस्ट्रिया आणि ग्रीससह 29 युरोपीय देशांमध्ये प्रवेश आणि मुक्तपणे प्रवास करण्याची परवानगी देतो. शिवाय, शेंजेन व्हिसा असल्यास इतर अनेक युरोपीय देशांमध्ये व्हिसा-मुक्त प्रवेश मिळतो. खरं तर, कोणालाही शेंजेन व्हिसा जारी करण्यापूर्वी कठोर तपासणी आवश्यक आहे. म्हणून, शेंजेन व्हिसा मिळवण्यासाठी कोणती कागदपत्रे लागतात हे जाणून घेऊया

कोणत्या देशात करु शकता पर्यटनशेंजेन व्हिसासह, तुम्ही स्लोवाकिया, बेल्जियम, फिनलंड, नॉर्वे, स्लोव्हेनिया, ऑस्ट्रिया, एस्टोनिया, नेदरलँड्स, बल्गेरिया, फ्रान्स, पोलंड, स्पेन, क्रोएशिया, जर्मनी, डेन्मार्क, हंगेरी, लाटविया, आइसलँड, इटली, पोर्तुगाल, स्वीडन, झेक प्रजासत्ताक, ग्रीस, रोमानिया, स्वित्झर्लंड, लिथुआनिया, लिकटेंस्टाईन, लक्झेंबर्ग आणि माल्टा येथे प्रवेश करू शकता. तसेच तुम्ही शेंजेन व्हिसासह बेलारूस, सायप्रस, दक्षिण कोरिया, मेक्सिको, कोलंबिया, किर्गिस्तान, सर्बिया, ग्वाटेमाला, निकाराग्वा, व्हॅटिकन सिटी, अल्बेनिया, जॉर्जिया आणि फिलीपिन्स यासारख्या इतर अनेक देशांमध्ये देखील प्रवेश करू शकता. पण शेंजन व्हिसा धारकांनी लक्षात ठेवावे की, ते या व्हिसावर आयर्लंड आणि युनायटेड किंग्डममध्ये प्रवेश करू शकत नाही.

शेंजेन व्हिसासाठी आवश्यक कागदपत्रेशेंजेन व्हिसा प्राप्त करण्यासाठी तुमच्याकडे काही कागदपत्रे असणे आवश्यक आहे. या व्हिसासाठी भारतीय रुपयांमध्ये 8100 ते 9600 रुपयांदरम्यान फी आहे. तुमच्याकडे प्रवासाच्या तारखेपासून किमान 3 महिन्यांची वैधता असलेला पासपोर्ट, फ्लाइट्स तिकिटे, हॉटेल बुकिंग, किमान 30,000 युरोचा प्रवास विमा, गेल्या 3 ते 6 महिन्यांचे बँक स्टेटमेंट आणि गेल्या 2 ते 3 वर्षांचे आयटीआर असणे आवश्यक आहे.

अर्ज कुठे करावातुम्ही ज्या देशामध्ये सर्वात जास्त काळ राहणार आहात किंवा ज्या देशात प्रथम प्रवेश करणार आहात त्या देशाच्या दूतावासात अर्ज करा.

2026-02-27T15:02:03Z