नवी दिल्ली: शनिवारी सकाळी इस्रायल आणि अमेरिकेकडून इराणवर हल्ले करण्यात आले. राजधानी तेहरान आणि इतर परिसरात हे हल्ले केले गेले. त्यानंतर इस्रायल आणि अमेरिकेच्या आखाती देशांमधील तळांवर इराणकडून हल्ले केले गेले. त्यामुळे मध्य पूर्व देशांमध्ये संघर्ष पेटला आहे. याचा परिणाम भारतावरही होणार आहे. इराणसोबत भारतचा व्यापार 1.68 अब्ज डॉलरचा आहे.
इराणला भारताकडून होणाऱ्या वस्तूंची निर्यातभारत इराण प्रामुख्याने बासमती तांदूळ, चहा, साखर, फळे, मांस, औषधे,औद्योगिक यंत्रसामग्री, वाहनांचे सुटे भाग, कापूस सूत, कागद, रबर उत्पादने आदींची निर्यात करतो.
इराणकडून होणारी आयातइराण भारताला सफरचंद, पिस्ता, खजूर किवी, खनिजे, खते, बांधकाम साहित्य, काचेच्या वस्तू, धातू
भारतावर होणारे परिणामहोरमुझची सामुद्रधुनी हा जगातील सर्वात महत्त्वाचा तेल वाहतून मार्ग आहे. जर युद्धामुळे हा मार्ग विस्कळीत झाल्यास भारतावर मोठा परिणाम होईल कारण तब्बल 40 ते 50 टक्के तेल वाहतूक या मार्गाने होते. इराणमध्ये भारताने विकसित केलेले चाबहार बंदराच्या कामकाजावर परिणाम होऊ शकतो. ह बंदर अफगाणिस्तान आणि मध्य आशियासाठी भारताचे प्रवेशद्वार आहे. युद्धाच्या काळात जहाजांचा विमा आणि भाडे 40 ते 50 टक्क्यांनी वाढू शकतात. इराणवर निर्बंध वाढले तर बँकिंग चॅनेल्स बंद होऊ शकतात. त्यामुळे भारतीय निर्यातदांराचे पैसे अडकू शकतात.
व्यापार कमी होण्याचे कारण अमेरिका2018-19 मध्ये भारत 17.03 अब्ज डॉलरचा व्यापार करत होता मात्र आता केवळ 1.68 अब्ज डॉलरचा व्यापार करत आहे. या घसरणीचे कारण ठरले आहे अमेरिकेचे कच्च्या तेलाच्या आयातीवर असलेले निर्बंध. अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांनी शनिवारी पुष्टी केली की अमेरिकेने इराणविरुद्ध लष्करी मोहीम सुरू केली आहे. येणाऱ्या धोक्यांना निष्प्रभ करणे आहे.
दोन देशांमधील संघर्षात भारताने नेहमीच संतुलित भूमिका घेतली आहे. संघर्ष दीर्घकाळ सुरू राहिल्यास भारतावर आर्थिक दबाव वाढू शकतो. संघर्षामुळे खनिज तेलाचे दर वाढू शकतात. त्यामुळे भारतासाठी आव्हानात्मक स्थिती निर्माण होऊ शकते.
2026-02-28T15:32:03Z