इतकं महाग झालेलं सोनं युद्धांमुळे आणखी महागणार! बाबा वेंगाचे भाकित खरे ठरणार?

Gold-Silver Price Forecast: गेल्या काही दिवसांतील नाट्यमय घसरणीनंतर भारत आणि जगभरात सोन्याच्या किमतीत पुन्हा एकदा दरवाढीचा भडका उडाला आहे. जागतिक भू-राजकीय तणाव वाढत असताना गेल्या काही महिन्यांत भारतातील सोन्याच्या किमतीत लक्षणीय वाढ झाली असून अशा परिस्थितीत, गुंतवणूकदारांनी काय करायचे याबाबत अनेकांमध्ये संभ्रम दिसत आहे.

Gold-Silver Investment Guide: गेल्या काही दिवसांतील नाट्यमय घसरणीनंतर भारतासह जगभरात सोन्याच्या किमतीत पुन्हा एकदा दरवाढीचा कल पाहायला मिळत आहे. गेल्या काही महिन्यांत जागतिक भू-राजकीय तणाव वाढल्यामुळे सोन्याच्या किमतीत लक्षणीय वाढ झाली पण, तणाव कमी होताच वेगाने वाढणाऱ्या सोन्याचा दर तितक्याच वेगाने खाली येतो, ज्यामुळे गुंतवणूकदार धास्तावले.बाबा वेंगाची सोन्याबाबत भविष्यवाणी

बाजारातील मंदीमुळे नुकसान कमी करण्यासाठी अनेकांनी सोने विकले, तर काहींनी कमी किमतीत अधिक सोने खरेदी करून जास्तीत जास्त फायदा घेण्याचा प्रयत्न केला आणि आता चांगला नफा कमावला. सोन्याच्या दरांवर परिणाम करणारे असंख्य घटक लक्षात घेता गुंतवणूकदार अनेकदा विश्लेषकांचा सल्ला घेतात. या दरम्यान, बरेच जण बल्गेरियन रहस्यमयी बाबा वेंगाच्या भाकितांवरही अवलंबून असतात. मध्यपूर्वेतील तणावाच्या पार्श्वभूमीवर 2026 साठी सोन्याबाबत बाबा वांगा भाकित्यांकडे पुन्हा एकदा लक्ष वेधले.

सोन्याची दरवाढ तात्पुरती का?

भारतीय बाजारात सध्या सोन्याचा भाव सुमारे 1.69 लाख रुपये असून यामुळे दीर्घकाळ गुंतवणूक केलेल्या आणि घसरणीदरम्यान खरेदी केलेल्यांना नक्कीच फायदा होत असेल, पण सोमवारच्या दरवाढीमुळे खरेदी करणाऱ्यांचे बजेट कोलमडले असेल परिणामी सोन्यातील ही दरवाढी तात्पुरती आहे का असा प्रश्न उपस्थित होत आहे.

बाबा वेंगाची भविष्यवाणी काय सांगते?

बाबा वेंगा यांनी 2026 मध्ये जागतिक स्तरावर मोठ्या आर्थिक संकटाची भविष्यवाणी केली होती. या संकटाचा बँकांवर परिणाम होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे पुन्हा व्याज दर वाढू शकतात.

अमेरिकेचा इराणवर हल्ला

अमेरिका आणि इराणमधील तणाव वेगवान वाढत असून मध्यपूर्वेतील वाढत्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर 2026 मध्ये जागतिक आर्थिक संकटाबद्दल बाबा वेंगाचे भाकीत खरे ठरू शकते असंच सध्या दिसत आहे. घसरता शेअर बाजार आणि जागतिक युद्ध सुरू असताना लोक सोने खरेदी करण्यासारख्या पारंपारिक सुरक्षित मालमत्तेकडे वळत आहेत.

सोन्याच्या किमतीत वाढ

जगात युद्धाचा धोका निर्माण होताना गुंतवणूकदार शेअर बाजारातून पैसे काढून सोन्या-चांदीमध्ये गुंतवतात. याच पार्श्वभूमीवर अलीकडच्या परिस्थितीने बाजारातील हालचाल पूर्णपणे बदलली आहे. सोन्याच्या किमती 25% ते 40% पर्यंत वाढीचा एक्स्पर्टसनी अंदाज वर्तवला आहे. यामुळे सोन्याचा भाव आतापर्यंतचा सर्वोच्च कळस गाठेल आणि प्रति 10 ग्रॅम 2 लाख ते 2.20 लाखांवर उसळी घेऊ शकतात.

जागतिक तणाव

जागतिक बाजारातील तणावाच्या पार्श्वभूमीवर तज्ञांनी सावधगिरी बाळगण्याची शिफारस केली आहे. सोन्याच्या दरात चढ-उतार होत असतात आणि जागतिक व्याजदर, चलनवाढ व भू-राजकीय घटकांचा किमतीवर लक्षणीय परिणाम होतो. अशा स्थितीत, जागतिक संकट दूर झाल्यानंतर किमतीत लक्षणीय घट होणे सामान्य आहे.

गुंतवणूकदारांनी कोणती रणनीती अवलंबायची?

आजचा जागतिक पातळीवरील अनिश्चिततेच्या काळात गुंतवणूकदारांनी दीर्घकालीन गुंतवणूक रणनीती कायम ठेवावी आणि सोशल मीडियावरील अफवांमुळे घाबरून सोन्याची खरेदी करणे टाळावे. सोन्यातील गुंतवणूक सुरक्षित असली तरीही आपल्या पोर्टफोलिओमध्ये जास्तीत जास्त वाटप करणे टाळा.

2026-03-02T14:32:04Z