अमेरिका, इस्रायल इराण यांच्यातील संघर्षाचा आर्थिक परिणाम भारतावर मोठ्या प्रमाणावर दिसत आहे. इराणशी संबंधित संघर्षाचा भारतावर दोन प्रकारे परिणाम होत आहे. पहिला कच्च्या तेलाच्या किमतीमधील वाढ आणि दुसरा डॉलरच्या तुलनेत रुपयात घट. रोज किती आणि कसं नुकसान होत आहे हे जाणून घेऊया
तेलानं झालेलं नुकसानभारत रोजी सुमारे 5 मिलियन म्हणजे 50 लाख बॅरल कच्चं तेल आयात करतो. जर सरासरी 10 डॉलर प्रति बॅरलची किंमत वाढ धरली, तर भारताला प्रत्येक दिवशी 50 लाख बॅरलवर 10 डॉलर अतिरिक्त द्यावे लागत आहे. यामुळे एकूण 50 मिलियन डॉलरचे अतिरिक्त देणे तयार होते. जर डॉलरची किंमत 91 रुपये मानली, तर हे सुमारे 455 कोटी रुपये दर दिवसाचा अतिरिक्त खर्च होतो. यानुसार चार दिवसांत तेलाच्या महागाईमुळे साधारण 1,820 कोटी रुपयांचा अतिरिक्त खर्च होतो.
रुपयात घट झाल्याने किती नुकसानडॉलरच्या तुलनेत रुपयात घसरण होण्याचा देखील परिणाम आहे. भारताचा वार्षिक तेल आयात खर्च साधारण 160 बिलियन डॉलर आहे. जर डॉलरच्या तुलनेत रुपया 1 रुपया कमी झाला, तर वार्षिक साधारण 16,000 कोटी रुपये अतिरिक्त खर्च वाढतो. याच खर्चाचा दर दिवसांप्रमाणे विचार केल्यास हा खर्च 44 कोटी रुपये होतो. म्हणजे चार दिवसांत साधारण 175 ते 180 कोटी रुपयांचा परिणाम करतो. तेलाच्या किंमत वाढ आणि रुपयांतील घसरणीने एकूण 2000 कोटी रुपयांचा अतिरिक्त खर्च झाला आहे.
अधिक चिंतेंच कारण काय? भारत आपल्या ऊर्जा गरजांसाठी मोठ्या प्रमाणावर आयातवर अवलंबून आहे, त्यामुळे दीर्घकालीन संघर्ष महागाई, पुरवठा आणि सरकारी वित्तीय व्यवस्थापनासाठी आव्हान बनू शकतो. जर हा आर्थिक ताण दीर्घकाळ राहिला तर नुकसान वाढू शकते. आज होमुर्झची सामुद्रधुनी इराणकडून बंद करण्यात आली आहे. जेथून जगातील 20 टक्के तेलाची वाहतूक होत होती. याचा परिणाम तेलाच्या किमतीवर दिसून येणार आहे.
2026-03-03T12:47:02Z